Aadhaar-Pan Card Linking : आधार-पॅन लिंकिंग बाबत केंद्र सरकारने घेतली कडक भूमिका, ऐकून बसेल तुम्हाला धक्का…


Marathi / Sunday, April 9th, 2023

Aadhaar-Pan Card Linking  : आधार कार्डचा वापर आता सर्वत्र अनिवार्य झाला आहे. आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक ही भारतीय नागरिकांची ओळख झाला आहे. आधार कार्ड हे आता फक्त ओळखपत्र राहिलेले नाही. अनेक ठिकाणी त्याचा वापर होत आहे. त्यामुळे पॅन कार्ड तुमच्या आर्थिक स्थितीचा हिशेब देते. पॅन कार्ड ही तुमची आर्थिक कुंडली आहे. ही दोन्ही कार्डे एकमेकांशी जोडल्याची चर्चा होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही दोन्ही कार्डे लिंक करण्याचे निर्देश दिले. भारताच्या आयकर विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. आधार कार्ड-पॅन कार्ड लिंकिंगची अंतिम मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून सशुल्क मुदतवाढ देण्यात आली आहे. आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा इशारा त्या नागरिकांना दिला आहे ज्यांनी ही दोन कार्डे लिंक केलेली नाहीत.

Aadhaar-Pan Card Linking

अनेकवेळा दिली मुदतवाढ

यापूर्वी पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ होती. नंतर ही तारीख वाढवण्यात आली. आता ही मुदतवाढ ३० जूनपर्यंत आहे. तुम्ही अद्याप तसे केले नसेल, तर लवकरात लवकर करा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरीच करू शकता.

दंडात कोणतीही सवलत नाही

अर्थात, ही मुदत वाढवून देताना केंद्र सरकारने नागरिकांना दंडाच्या रकमेतून कोणताही दिलासा दिलेला नाही. दंडाची मोठी रक्कम असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी लिंक करणेकडे पाठ फिरवल्याचा दावा करण्यात आला. तसेच या दंडाची रक्कम माफ करण्याची विनंती केली. मात्र केंद्राने हे दोन्ही कार्ड 1000 रुपये भरल्याशिवाय लिंक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

 कांदा अनुदान अर्ज सुरु, पहा अर्ज कसा करायचा

कृषी विभाग भरती सुरु, पहा कसा करायचा अर्ज

महाराष्ट्रात १० वी वरती सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

केंद्र सरकारने दिला हा इशारा

आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या नागरिकांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने ही दोन कार्डे लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. मात्र अनेकांनी याकडे लक्ष दिले नाही. यानंतर विलंब शुल्क आकारण्यात आले. सध्या हे लिंकिंग 500, 1000 रुपयांच्या दंडासह केले जात आहे. आता ही दोन्ही कार्डे नवीन मुदतीत लिंक न केल्यास दंड वाढेल. जून 2023 नंतर नागरिकांना लिंकिंग अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.