Anganwadi Bharti 2023 : आजपासून अंगणवाडी सेविका भरती सुरु, पहा किती जागा आहेत


नौकरी भरती / Monday, May 8th, 2023
65 / 100

अंगणवाडी भरती 2023 मध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि संबंधित राज्य सरकारांनी निर्धारित केलेल्या इतर आवश्यकता यासारख्या पात्रता निकषांवर आधारित निवड प्रक्रियेचा समावेश असेल. पात्र असलेले उमेदवार त्यांच्या राज्यात तसेच जिल्हा व तालुक्यात उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर अवलंबून अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.

अंगणवाडी भरती 2023

मा. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे दि.२७/०३/२०२३ चे पत्रान्वये अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / मदतनीस भरतीस स्थगीती देण्यात आलेली होती. सदर स्थगिती मिळालेली अंगणवाडी पदभरतीस मा. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे पत्र दि. २७/०४/२०२३ अन्वये अंगणवाडी सेविकांची पदे भरु नये, तसेच मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस ची सर्व रिक्त पदे तात्काळ भरणेबाबत आदेश प्राप्त झाले आहेत.

Movie Download Here

त्यान्वये प्रकल्प माळशिरस (ग्रामीण) व प्रकल्प अकलुज (ग्रामीण) पंचायत समिती माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर अंतर्गत रिक्त मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२३ सुरु करण्यात आली असुन प्रकल्प माळशिरस व अकलुज मधील १) मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदे = १७, ३) अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे ७६ सोबत यादी जोडली आहे. याप्रमाणे रिक्त पदाची भरती करण्या करिता सदर गावातील / नगरपंचायत/नगरपालीका मधील वय वर्षे १८ ते ३५ वर्षे व विधवाकरिता ४० वर्षे या वयोगटातील किमान शैक्षणीक पात्रता १२ वी उत्तीर्ण ( राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) इच्छुक महिला उमेदवाराकडुन दि.०८/०५/२०२३ ते १९/५/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय माळशिरस व अकलुज, पंचायत समिती माळशिरस ता. माळशिरस येथे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी सदर गावातील इच्छुक महिला उमेदवारांनी संपुर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. बालाजी आल्लडवाड बालविकास प्रकल्प अधिकारी माळशिरस अकलुज यांनी केले आहे.

अंगणवाडी मदतनीस भरती 2023

अंगणवाडी सेविकांना मुलांना सेवा पुरवण्यात मदत करण्यात अंगणवाडी मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. ते अन्न तयार करणे आणि वाटप सर्व्ह करणे, स्वच्छता आणि स्वच्छता मानके राखणे आणि मुलांसाठी क्रियाकलाप आयोजित करण्यात मदत करतात.

अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित राज्य सरकारने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. निकषांमध्ये सामान्यत: शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यकता समाविष्ट असतात. भरती प्रक्रियेत सहसा लेखी परीक्षा किंवा मुलाखत असते, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम असतो.

अंगणवाडी भरती फॉर्म 2023 महाराष्ट्र last date

अंगणवाडी भरती फॉर्म 2023 महाराष्ट्र साठी १९/०५ २०२३ ही शेवटची तारीख असून इच्छूक उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची हि अंतिम मुदत आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी ! मानधन वाढीचा GR निघाला, पहा कशी आणि कधीपासून भेटणार आहे

अंगणवाडी साठी अर्ज भारताय ? हि कागदपत्रे तयार ठेवा

या तारखेपासून अंगणवाडी भरती होणार सुरु, हि असेल पात्रता

अंगणवाडी भरती फॉर्म 2023 pdf

अंगणवाडी भरती फॉर्म 2023 pdf भरती प्रक्रिया आयोजित करणाऱ्या संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. आपण अधिकृत वेबसाइटवर जाऊन तो फॉर्म डाउनलोड करू शकता. आम्ही आपणासाठी अंगणवाडी भरती फॉर्म 2023 pdf उपलब्ध करून देत आहोत. अंगणवाडी भरती फॉर्म 2023 pdf डाउनलोड येथे करा

अंगणवाडी भरती फॉर्म 2023 महाराष्ट्र online form भरायचा नसून तो ऑफलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. उमेदवारांनी संबंधित तालुकयातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून सादर करावयाचा आहे.

अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेच्या रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली आहे. एकूण 207,961 मंजूर पदांपैकी अंगणवाडी सेविकेसाठी 97,475 पदे,अंगणवाडी मदतनीस साठी 13,011 पदे आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी साठी 97,475 पदे भरतीसाठी मंजूर करण्यात आली आहेत. अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय येथे पहा