अंगणवाडी साठी अर्ज भारताय ? हि कागदपत्रे तयार ठेवा


Marathi / Friday, February 24th, 2023

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे 2023 : अंगणवाडी भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे: तुम्हाला अंगणवाडीत रुजू व्हायचे आहे का? मला अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी अर्ज करायचा आहे. तसेच ज्या महिलांना अंगणवाडी मदतनीस म्हणून भरती व्हायचे आहे, ज्या महिलांना अंगणवाडीत भरती व्हायचे आहे त्यांना भरतीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. चला तर मग आज जाणून घेऊया अंगणवाडी भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे 2023

1) अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे

  1. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  2. चौथी पास, सातवी उत्तीर्ण गुणपत्रिका
  3. 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  4. निवास प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. नावात बदल झाल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र सादर करावे लागेल.
  7. आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदार कार्ड
  8. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

तुम्हाला हेही वाचायला आवडेल

या तारखेपासून अंगणवाडी भरती होणार सुरु, हि असेल पात्रता

अंगणवाडी सेविका यांच्या संपात आता यांची ऊडी, मागण्या मान्य करा नाहीतर आम्हीही संप करू

अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया

२) अनुभव
अंगणवाडी सेविका या पदासाठी मदतनीस म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे . यासोबतच संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्रही अर्जासोबत जोडावे लागणार आहे (असेल तर ) . त्यात कालावधीचा उल्लेख असावा अनुभवाचा कालावधी नमूद करावा.

3) वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

जर तुम्हाला अंगणवाडी सेविका मध्ये काम करायचे असेल तर अंगणवाडी भरतीसाठी वरील कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत. अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत दिलेली माहिती कशी वाटली, कृपया कमेंटद्वारे कळवा. तसेच, आम्हाला आशा आहे की तुम्हाला अंगणवाडी भरती दस्तऐवजाची दिलेली माहिती आवडली असेल. तसेच, तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता.