अंगणवाडी,आशा सेविकांना आनंदाची बातमी ! तुमच्या मानधनात होणार ‘इतकी’ वाढ


नौकरी भरती / Thursday, March 9th, 2023

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. यावेळी मोठा दिलासा देत त्यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, सहाय्यकांची एकूण 20 हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

सध्या राज्यातील आशा स्वयंसेविकांचे सध्याचे वेतन 3 हजार 500 रुपये आहे. त्यामुळे गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन 4 हजार 700 रुपये आहे. मानधनात 1500 रुपयांनी वाढ करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच  अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 रुपयांवरून 7 हजार २०० रुपये करण्यात येत आहे. याशिवाय अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 रुपयांवरून 5500 रुपये करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

राज्य सरकारची बजेटमध्ये घोषणा ! या योजनेतून मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! आता मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये, शासनाची मोठी घोषणा

पांढरा मोर ! असे दृष्य तुम्ही यापूर्वी कधी पहिले नसेल

अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांच्या महिलांसाठीच्या घोषणा

  • महिला एकता मॉल मुंबई स्थापित होईल.
  • महिला सुरक्षा, प्रवासासाठी महिला केंद्र पर्यटन धोरण लागू करणे.
  • एसटी वर सफर करणारी महिलांसाठी टिकट वर एकूण 50 % सूट
  • चौथी सर्व-समावेशी महिला धोरणाची घोषणा
  • मुलीच्या जन्मास 5000 रुपये मिळणार
  • मुलगी 18 वर्षे झाल्यावर 75 हजार मिळणार