राज्यातील हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी सरकारची खुशखबर, पगारात मोठी वाढ. शासन निर्णय जारी केला.दिनांक १७ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यातील भूमिका व महत्व विचारात घेऊन आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना राज्य निधीतून मोबदला देणेबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.
आपल्याला हेही वाचायला आवडेल
अरे बापरे ! पांढरी साडी नेसलेली महिला चक्क चालते पाण्यावर
8वी ते 10वी वरती इंडिया पोस्ट विभागात भरती, असा करा अर्ज
काय सांगता ! आता फक्त झोपायचे आणि लाखो रुपये कमवायचे, ‘या’ संस्थेमध्ये मिळते झोपायची नोकरी
- आशा सेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये 35००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १5००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये 47००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १500/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- उपरोक्त अ.क्र. १ व २ मध्ये प्रास्तवित केलेली वाढ 1 एप्रिल २०२3 या महिन्यापासून देय होणा-या मोबदल्यात अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी शासन GR पहा
येथे पहा