मोदी सरकार बेरोजगार तरुणांना देणार मोफत दरमहा ६००० रुपये, पहा यामागील सत्य


Marathi / Tuesday, February 21st, 2023

केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. याचा अनेकांना खूप फायदा होत आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका मेसेजने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
बेरोजगार तरुणांना सरकार दरमहा सहा हजार रुपये देणार असल्याचा दावा या संदेशात करण्यात आला आहे. हा व्हायरल मेसेज खरा की खोटा, याची तपासणी पीआयबीने केली आहे. मग या व्हायरल मेसेजमागील सत्य काय आहे? तुम्हाला माहीत आहे का.

पीआयबीने त्यामागील तथ्य तपासून खालील माहिती उघड केली आहे

सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत असून सरकार आता बेरोजगारांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याच्या सत्यतेची पुष्टी केली आहे.
एका व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकार प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 6,000 रुपये भत्ता देत आहे.

व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा आहे.
कारण भारत सरकार अशी कोणतीही योजना राबवत नाही.
त्यामुळे चुकूनही मेसेज फॉरवर्ड करू नका.

चुकूनही हा मेसेज शेअर करू नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे खोटे संदेश कधीही शेअर करू नयेत. तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा लागेल.

तथ्य तपासणी

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या शेअर करू नका, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तुम्हाला कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.