सरकारी बँकेत नोकरीची संधी ! या बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी निघाली मोठी भरती । Central Bank of India Recruitment 2023


नौकरी भरती / Monday, April 17th, 2023

Central Bank of India Recruitment 2023 : पदवीधर उमेदवार तसेच बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत मोठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आली आहे, हि बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे आणि या भरतीद्वारे सुमारे 5000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आज आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी भरती आहे?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिझनेस करस्पॉन्डंट/फॅसिलिटेटर या पदासाठी 5000 रिक्त जागा भरणार आहे.

शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का?

कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार यासाठी पात्र असतील. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी लागेल.

आवश्यक वयोमर्यादा?

२० ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. यासोबतच आरक्षित उमेदवारांनाही नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आनंदाची बातमी ! रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क मिळणार परत, या परीक्षार्थींना फी परत मिळणार 

आता शेकऱ्यांसाठी आला किसानजीपीटी चा AI चॅटबॉट , आता चांगले पिक घेऊन शेतकरी होणार मालामाल 

काय सांगता ! तुमच्या शरीरावर येथे टॅटू असेल तर हातातून जातील या सरकारी नोकऱ्या 

किती पगार मिळेल?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 10,000 ते 15,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6412cbf5977ed17c321d25e2 या लिंकला भेट देऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख?

इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वास्तविक, 3 एप्रिल 2023 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.