सैन्यात भरती होणारांसाठी मोठी बातमी ; भरतीच्या नियमांत झाले मोठे बदल


Marathi / Tuesday, February 28th, 2023

Indian Army Bharti Niyamat Badal : आता उमेदवार वर्षातून एकदाच भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासह मैदानी चाचणीपूर्वी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
आता दरवर्षी भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच शारीरिक चाचणीसह मैदानी आणि वैद्यकीय चाचणीचे नियमही बदलणार आहेत. त्यामुळे तुम्ही सैन्यात भरती होण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Indian Army Bharti Niyamat Badal

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासह मैदानी चाचणीपूर्वी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मैदानी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदा सैन्य भरतीसाठी अर्ज करू शकतात. शारीरिक चाचणीपूर्वी सीईटी घेतली जाईल. पीटीआयने चौहान यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. आतापर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणीपूर्वी आणि नंतर चाचणी घेतली जात होती.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आरोग्य विभाग भरती 2023; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

भारतीय सैन्यात सामील होण्याची सुवर्णसंधी; या पदांची मोठी भरती ६९००० पर्यंत मिळेल पगार

या जिल्हा परिषद मध्ये १२ वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, भरती सुरु त्वरित अर्ज करा

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 16 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंतच वेळ असेल. नवीन भरती प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात भरती सूचना, ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र, ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा, निकाल आणि कॉल-अप यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रवेशपत्र, बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.