१० वी पास वर भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; पहा कसा करायचा अर्ज


Marathi / Thursday, March 2nd, 2023

भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा बाळगणारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण इंडियन नौदल अकादमी लवकरच काही पदांची भरती करणार आहे. नौदल विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून त्यानुसार ट्रेडसमनच्या २४८ पदांची भरती केली जाणार आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भर्ती 2023 साठी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. हा अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, महत्त्वाची आणि आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रियेची माहिती आपण जाणून घेऊया.

भारतीय नौदलात 248 रिक्त पदांसाठी स्किल्ड ट्रेडसमन भरती 202३ तर ट्रेडसमन पदावर ही भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता –
भारतीय नौदलात ट्रेडसमन पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित पदांनुसार उमेदवारांनी आयटीआयपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

या शहराची पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षा पात्र यादी झाली जाहीर, यादी पहा

बँकेत काम करायचे आहे ? या बँकेत लिपिक पदाची भरती सुरु, लगेच अर्ज करा

सैन्यात भरती होणारांसाठी मोठी बातमी ; भरतीच्या नियमांत झाले मोठे बदल

अर्ज शुल्क –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील तरुणांसाठी अर्ज शुल्क 205 रुपये असेल. अनुसूचित जाती/जमाती/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवशकता नाही.

भारतीय नौदल स्किल्ड ट्रेडसमन भरती २०२३ निवड प्रक्रिया कशी असेल –

भारतीय नौदलात ट्रेडसमन पदासाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल

  • लेखी परीक्षा
  • दस्तऐवज सत्यापन
  • वैद्यकीय तपासणी

परीक्षेचा पॅटर्न कसा असेल –
भारतीय नौदलातील स्किल्ड ट्रेडसमन भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कट ऑफ परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

या पद्धतीने अर्ज करा-

  • joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट द्या आणि तिथे तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक मिळेल.
  • ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आवश्यक फी भरा.
  • भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.