जिओकडून ग्राहकांना होळीचं मोठं गिफ्ट ! एक महिन्याचा मोफत रिचार्ज, असा घ्या या गिफ्टचा फायदा


Marathi / Sunday, March 5th, 2023
Jio 1 महिना मोफत रिचार्ज:टेलिकॉम कंपनी जिओ अनेकदा ग्राहकांना रिचार्ज प्लॅनवर मोठ्या प्रमाणात सूट देते. तसेच, सुरुवातीला कंपनीने सर्व ग्राहकांना मोफत सेवा दिली. जिओ कंपनी वेळोवेळी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असल्याने अनेक लोक जिओ टेलिकॉम कंपनीकडे आकर्षित होत आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीतून जिओ टेलिकॉम कंपनीची स्थापना झाली तेव्हा ग्राहकांना पहिली 2 वर्षे मोफत सेवा दिली जात होती. त्यामुळे जिओचे सुरुवातीला लाखो ग्राहक झाले.

आता कंपनीच्या वतीने होळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोफत रिचार्ज देण्यात येत आहे. कंपनी अनेकदा ग्राहकांसाठी आश्चर्यकारक ऑफर आणत असते. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना मिळत आहे. आता तुम्हालाही तुमचा जिओ सिम रिचार्ज करायचा असेल तर थोडी प्रतीक्षा करा. कारण Jio 1 महिन्याचा फ्री रिचार्ज देत आहे. तुम्ही मोफत रिचार्ज देखील घेऊ शकता.

Jio 1 महिना मोफत रिचार्ज

आपल्यला हेही वाचायला आवडेल

पुण्यात निघाली मोठी भरती ! सरकारी नोकरीची मोठी संधी, पहा कसा करायचा अर्ज

10वी पास उमेदवारांसाठी भरतीची घोषणा; या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता हि गोष्ट मिळेल निम्म्या किमतीत, केंद्र सरकारची मोठी घोषणा

1 महिन्याचे जिओ रिचार्ज पूर्णपणे मोफत कसे मिळवायचे?
जिओची होळी ऑफर लागू झाली आहे. जर तुम्ही Jio चे ग्राहक असाल तर कंपनी तुमच्यासाठी 2999 रुपयांचा प्लान घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला पहिले ३६५ दिवस अमर्यादित कॉल्सची सुविधा मिळेल. 2.50GB डेटा प्रतिदिन 100SMS सह उपलब्ध असेल.
जिओ कंपनीने आता या रिचार्ज प्लानमध्ये काही बदल केले आहेत. आता तुम्ही 1 महिन्याचे फ्री रिचार्ज घेऊ शकता. Jio कंपनीच्या 2999 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांवरून 388 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.50GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 100SMS दररोज मिळतात. कंपनीने या रिचार्ज प्लॅनचा कालावधी 23 दिवसांसाठी वाढवला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.
जर तुम्हालाही हा 1 महिन्याचा फ्री रिचार्ज हवा असेल तर तुम्हाला 2999 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला जवळपास 23 दिवस मोफत मिळत आहेत. त्यामुळे तुमचे 1 महिन्याचे पैसे वाचवा.