या कंपनीत महिन्याला ४ लाख पगार, तरीही कोणीही कामाला तयार होईना


Marathi / Wednesday, February 22nd, 2023

ऊर्जा क्षेत्रातील कंपनी हि वेतन जवळपास 4 महिन्यांचे देत आहे. दरमहा चार लाख रुपये पगार असूनही कंपनीला अद्याप एकही कर्मचारी मिळालेला नाही. कंपनीला एकूण ५ कर्मचाऱ्यांची गरज आहे.

सध्या अनेक मोठ्या कंपन्या टाळेबंदीच्या मार्गाने जात आहेत. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. अनेक वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पण या कंपनीला कामासाठी कर्मचारी मिळत नाहीत. कंपनी दरमहा चार लाख रुपये देण्यास तयार आहे. मात्र आतापर्यंत कंपनीला उमेदवार सापडलेला नाही.

स्कॉटलंडमधील एबरडीनला किनार्‍याजवळ रोजगाराचे ठिकाण आहे. पाच पदे रिक्त आहेत. समुद्रातील विहिरींमधून वायू आणि खनिज तेल काढण्याचे काम येथे केले जाते. कंपनीला त्याच कामासाठी लोकांची गरज असते. ऑफशोअर तेल विहिरींवर काम करणे धोकादायक आणि त्रासदायक आहे. विहिरी खोदणे, त्यातून तेल आणि वायू काढणे आणि नंतर ते तेल रिफायनरीमध्ये पाठवणे हे काम ऑफशोअर तेल विहिरींमध्ये केले जाते.

नोकरीचे ठिकाण उत्तर समुद्राच्या आसपास स्कॉटलंडमध्ये आहे. कामाचा कालावधी 1 ते 6 महिन्यांपर्यंत आहे. कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त ६ महिने सतत काम करावे लागेल. त्यासाठी दरमहा चार लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. एका कर्मचाऱ्याला दिवसाचे 12 तास काम करावे लागते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने दोन वर्षे काम केले तर 6-6 महिन्यांच्या प्रत्येक शिफ्टमध्ये त्याचा पगार 1 कोटी होईल. कंपनीने त्याचे नाव जाहीर केलेले नाही. पण कंपनी ही ऊर्जा क्षेत्रातील एक मोठी संस्था आहे.

योग्य उमेदवाराला तांत्रिक आणि सुरक्षा प्रशिक्षण मिळाले असले पाहिजे. BOSIET म्हणजेच बेसिक ऑफशोर सेफ्टी इंडक्शन आणि इमर्जन्सी ट्रेनिंग, FOET म्हणजेच अतिरिक्त ऑफशोर इमर्जन्सी ट्रेनिंग, CA-EBS म्हणजेच कॉम्प्रेस्ड एअर इमर्जन्सी ब्रेथिंग सिस्टम आणि OGUK मेडिकल ट्रेनिंग आवश्यक आहे. कंपनीने या पदांसाठी २४ दिवस अगोदर जाहिरात दिली आहे. मात्र त्यांना अद्याप योग्य उमेदवार सापडलेला नाही.