Kanda anudan 2023 : कांदा अनुदान अर्ज सुरु, पहा अर्ज कसा करायचा


शेतकरी योजना / Sunday, April 9th, 2023

Kanda anudan 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या अनुदानाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यानुसार आता शेतकऱ्यांना कांद्यावर प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदान 2023 चा शासन निर्णय आज राज्य सरकारने जाहीर केला असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना कांद्यावर प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे.यासाठी 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.

कांदा अनुदान 2023

कांदा अनुदान 2023 मिळवण्यासाठी अर्ज कोठे सादर करावे ?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी अर्ज करावा लागणार असून सदर अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार तसेच नाफेडच्या खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात व सहकारी संस्था कार्यालय देखील उपलब्ध करून देण्यात येईल आणि हा अर्ज तेथेच सादर करण्यात यावा.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

कृषी विभाग भरती सुरु, पहा कसा करायचा अर्ज

महाराष्ट्रात १० वी वरती सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ पदांची भरती सुरु

कांदा अनुदान 2023 साठी लागणारी कागदपत्रे

  • विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
  • कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
  • बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  • आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
  • 7/12 उतारा वडिलांच्या नावावर आणि विक्रीपत्र मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असल्यास कराराचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

वरील अर्ज विहित मुदतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक, शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी कांदा विकला त्या ठिकाणचे नाफेड खरेदी केंद्र यांच्याकडे जमा करावेत, असे पणन संचालकांनी कळविले आहे.

कांदा अनुदान 2023 अर्ज – येथे पहा