आता शेकऱ्यांसाठी आला किसानजीपीटी चा AI चॅटबॉट , आता चांगले पिक घेऊन शेतकरी होणार मालामाल | Kissan GPT


शेतकरी योजना / Thursday, April 13th, 2023

Kissan GPT : सध्या ChatGPT हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान चर्चेत आहे. त्याचा वापर करून कृषी क्षेत्रात काय बदल करता येतील यावरही चर्चा सुरू आहे. भारतात जन्मलेले, शेतकरी कुटुंबात वाढलेले, यूएस-शिक्षित संगणक शास्त्रज्ञ, प्रतीक देसाई यांनी ChatGPT वर एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान तयार केले आहे जे भारतातील नऊ भाषांमध्ये कृषी चर्चा करू शकते. कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीशी संवाद साधता यावा, तोही मातृभाषेत अशा पद्धतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी KissanGPT नावाचा एक नवीन AI-चॅटबॉट लाँच करण्यात आला आहे. भारत हे एक कृषी पॉवरहाऊस असल्याने, हा AI चॅटबॉट पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. या तंत्रज्ञानामुळे त्यांना शेतीतील विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन घेण्यास मदत होईल.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

काय सांगता ! तुमच्या शरीरावर येथे टॅटू असेल तर हातातून जातील या सरकारी नोकऱ्या 

४ थी पासवर मुंबई उच्च न्यायालयात स्वयंपाकी पदाची भरती, असा करा अर्ज 

पीक लागवड, सिंचन, कीड नियंत्रण यावर KissanGPT कडून योग्य सल्ला मिळणार

KissanGPT पीक लागवड, सिंचन, कीड नियंत्रण आणि इतर कृषी संबंधित बाबींवर वेळेवर सल्ला देऊ शकतात. शेतकरी त्यांच्या स्मार्टफोनद्वारे चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. याद्वारे शेतकऱ्यांना सहज माहिती मिळू शकते. प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या किसान जीपीटीच्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञांमधील दरी भरून काढली जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा नफा वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि संसाधने मिळतील.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

स्टाफ सिलेक्शन कमिशन 7500 पदांची बंपर भरती, CBI, IB मध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज 

काय सांगता ! आता घरूनच करा आधार प्रमाणीकरण, आधार टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर प्रणाली 

शेतीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी याची मदत होणार

KissanGPT ला आधीच वापरलेल्या शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांचे म्हणणे आहे की यामुळे त्यांना त्यांच्या पिकांबद्दल चांगले निर्णय घेण्यात आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत झाली आहे. किसानजीपीटी हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले शक्तिशाली नवीन साधन आहे.जे त्यांना शेतीतील आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकतात आणि त्यांच्या शेतात अधिक यश मिळवू शकतात. भारतातील शेतकरी AI चॅटबॉट, KisanGPT कडे वळत आहेत. जे कृषी संबंधितांना त्यांचा नफा वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. शेतकऱ्यांमध्ये चॅटबॉट्स लोकप्रिय होत आहेत.