राज्य सरकारची बजेटमध्ये घोषणा ! या योजनेतून मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख


शासकीय योजना / Thursday, March 9th, 2023

लेक लाडकी योजना : राज्याचा अर्थसंकल्पीय ठराव (महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023) सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये रोख मिळणार आहेत. ‘लेक लाडकी’ या नावाने ही योजना फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

‘लेक लाडकी’ योजना

‘लेक लाडकी’ योजना काय आहे ?

यावेळी बोलताना फडणवीस यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना 5,000 रुपये (महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023), इयत्ता ४ थीत असताना 4,000 रुपये, इयत्ता 6 वीत असताना ६000 रुपये आणि इयत्ता 11वीला असताना 11,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार रुपये दिले जातील.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! आता मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये, शासनाची मोठी घोषणा

भयानक ! बेडकाला सापाने गिळताना आपण पहिले असेल पण अख्खा माणूस गिळताना ?

काय सांगता ! आता करावी लागेल डिजिटल मालमत्तेची सुद्धा केवाईसी

लेक लाडकी ‘ योजना नव्या स्वरूपात

  • मुलींच्या सक्षमीकरणाची ‘लेक लाडकी‘ योजना आता नव्या स्वरूपात आली आहे
  • पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींना लाभ
  • जन्मानंतर प्रति मुलगी 5000 रु
  • ४ थीत असताना 4000 रुपये, सहावीसाठी 6000 रुपये
  • 11वी मध्ये 11,000
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000