आनंदाची बातमी ! रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क मिळणार परत, या परीक्षार्थींना फी परत मिळणार | Mahabharti Exam Fee Will Be Refunded


Marathi / Friday, April 14th, 2023

Mahabharti Exam Fee Will Be Refunded : जिल्हा परिषदेसाठी होणारी महाभारती राज्य सरकारने रद्द केली त्यानंतर आता त्या परीक्षेसाठी घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण फी परत न करता विद्यार्थ्यांना केवळ 65 टक्के फी परतावा मिळणार आहे.
महाभरती प्रक्रिया ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाली होती. या दोन्ही जाहिरातींनुसार पात्र उमेदवारांनी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, नंतर ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. 2019 मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी कंपनीने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क म्हणून ३३ कोटी रुपये घेतले होते. मात्र ही कंपनी बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून परीक्षा रद्द करण्यात आली.

असे परीक्षा शुल्क उमेदवाराला परत केले जाईल

  • या भरती प्रक्रियेत सहभागी एकूण जिल्हा परिषदा-34
  • राज्यातील परिक्षार्थींचे एकूण शुल्क – ३३ कोटी ३९ लाख ४५ हजार २५० रुपये
  • राज्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला वर्गीकृत शुल्क – २१ कोटी ७० लाख ६४ हजार ४१३ रुपये
  • महाभारत प्रक्रिया ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झाली होती हे परीक्षा कधी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. या दोन्ही जाहिरातींनुसार, पात्र उमेदवारांनी परीक्षा शुल्कासह उमेदवारी दाखल केली होती. मात्र, नंतर ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी त्यासाठी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी केली.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आता शेकऱ्यांसाठी आला किसानजीपीटी चा AI चॅटबॉट , आता चांगले पिक घेऊन शेतकरी होणार मालामाल

काय सांगता ! तुमच्या शरीरावर येथे टॅटू असेल तर हातातून जातील या सरकारी नोकऱ्या 

राज्यात शासनाकडून मेगा भरती जाहीर केली जाते, कधी 75 हजार तर कधी 10 हजारांची आकडेवारी जाहीर केली जाते. तथापि, जिल्हा परिषद अंतर्गत 18 विविध 13521 पदांसाठी भरती कार्यक्रम 26 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर करण्यात आला. या पदांसाठी 12 लाख 72 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. या अर्जातून आणि परीक्षा शुल्कातून सरकारला 33 कोटींचा महसूल मिळाला आणि विद्यार्थ्या परीक्षेच्या अभ्यासाला लागले. परंतु अचानक 19 सप्टेंबर 2022 रोजी या भरतीची जाहिरात आणि कार्यक्रम रद्द करण्यात आला. आजची परीक्षा उद्या होणार आहे, त्यामुळे आजही विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

४ थी पासवर मुंबई उच्च न्यायालयात स्वयंपाकी पदाची भरती, असा करा अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशन 7500 पदांची बंपर भरती, CBI, IB मध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज 

ही भरती प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने एका खासगी कंपनीची नियुक्ती केली होती. परंतु त्याऐवजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा आयबीपीएस संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद स्तरावर IBPS सोबत सामंजस्य करार करून अर्ज स्वीकारण्यासाठी वेबसाइट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र ही चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऑगस्ट 2022 साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.