Mahanagarpalika Bharti २०२३ : या महानगरपालिकेत या पदासाठी होणार विना परीक्षा थेट मुलाखत, असा करा अर्ज


नौकरी भरती / Friday, April 7th, 2023

Mahanagarpalika Bharti २०२३ : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी खास आहे. कारण, ठाणे महापालिकेत नोकरभरती जाहीर झाली आहे. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील परिचरांची (अटेंडट) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Mahanagarpalika Bharti 2023

विशेष म्हणजे या भरतीअंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. म्हणजेच यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. दरम्यान, आज आपण या भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

किती पदांची भरती होणार?

ठाणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात परिचर (अटेंडट) पदाच्या २४ जागा भरण्यात येणार आहेत. या अधिसूचनेत SC – 2, ST – 2, भटक्या जमाती (D) – 1, विशेष मागास प्रवर्ग – 1, OBC – 6, OBC – 2. – 10 रिक्त पदे भरण्याचे नमूद केले आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सरकारने मंजूर केलेला MSCIT किंवा तत्सम मूलभूत संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार ज्यांचे वय कमाल 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय 42 वर्षे असेल ते यासाठी पात्र असतील.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

CRPF Mega Bharti २०२३; १० वी वरती देशातील तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची सर्वात मोठी भरती

काय सांगताय राव ! आता फोन पे, गूगल पे वर खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार

अबब ! ३० हजार रुपये किलो भाजी; सुरु करा या भाजीचा व्यवसाय, बाजारात प्रचंड मागणी

अनुभव

शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था विच्छेदन कक्ष / शवविच्छेदन संबंधित 3 वर्षांचे कामाचा अनुभव असावा.

 

तुम्हाला किती पगार मिळेल?

या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.२०,०००/- मिळेल.

 

मुलाखत कधी आणि कुठे होणार?

या पदासाठी मुलाखतीचा कार्यक्रम काई.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे होणार आहे. मुलाखत 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता होईल परंतु इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

जाहिरात- येथे पहा