शासनाकडून या दिवशी मिळणार १०० रुपयात आनंदाचा शिधा,पामतेल, चनाडाळ आणि बरच काही


Marathi / Wednesday, February 22nd, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचे सदस्यही उपस्थित होते. एकनाथ शिंदे सरकारने आता दिवाळी तसेच गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये १०० रुपयांत पामतेल, हरभरा डाळ, साखर आणि रवा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे घेतलेले निर्णय

गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा १ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील उर्ध्वा प्रवरा प्रकल्पाच्या कामाला गती देणेबाबत निर्णय घेणेत आले.
5177.38 कोटी खर्चास सुधारित मान्यता .
६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ .

तुम्हाला हेही वाचायला आवडेल

आता एका क्लिक वर मिळेल रेशनकार्ड, मोजावी लागेल इतकी रक्कम

आता मिळणार रेशनकार्ड शिवाय रेशन, सरकारची नवी योजना

रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला

यापूर्वी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावरच देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राज्य सरकारने गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीही साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार महाराष्ट्र गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पामतेल, हरभरा डाळ, साखर आणि रवा 100 रुपयांना उपलब्ध होणार आहे.