या तारखेपासून सर्व महिलांना S.T. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये ५०% सवलत


Bank, Bank Loan, Bank News, Bank Recruitment, Entertainment, Marathi, Uncategorized / Friday, March 17th, 2023

महिला सन्मान यॊजना 2023: नुकतेच महाराष्ट राज्याचे सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये सर्व महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये आकारल्या जाणाऱ्या बस भाड्यात ५०% सवलत घोषित केली होती. या घोषणेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते तसेच अनेक महिला ST कंडक्टर शी भांडताना आपण पहिले असेल ही, पण राज्य परिवहन महामंडळाला तश्या सूचना अजून झाल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना महिलांना सवलत देता येत नव्हती. आता तश्या सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगार आणि वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला सन्मान यॊजना 2023

महिला सन्मान यॊजना 2023- महिलांसाठी हि सवलत आज म्हणजेच दिनांक १७/०३/२०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. महिलांना यामध्ये सर्व प्रकारच्या बसेस म्हणजेच साधी, मिडी/मिनी,निमआराम, विनावातावनकुलीत शयन-आसनी, शिवशाही(आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातावनकुलीत ) आणि इतर प्रकारच्या बसेस मध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच राज्य परिवहन महामंडळात भविष्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करीत देखील हि योजना लागू राहील. या योजनेला “महिला सन्मान यॊजना” या नावाने ओळखले जाईल.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

१२ वी पासवर या जिल्ह्याची निघाली अंगणवाडी भरती; असा करा अर्ज

४ थी पासवर 47 हजार पगार; मुंबई हाय कोर्ट मध्ये काम करण्याची संधी

कर्जमाफीची ४ थी यादी जाहीर, पहा आपले नाव यादीत आहे का ?

या तारखेपासून सर्व महिलांना S.T. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये ५०% सवलत
                                                                                           महिला सन्मान यॊजना