महिलांसाठी मोठी खुशखबर ! आता महिलांना या बसमधून करता येणार मोफत प्रवास


शासकीय योजना / Sunday, March 5th, 2023

महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बसमध्ये दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. PMPL चा हा स्तुत्य उपक्रम येत्या ८ मार्चपासून म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होणार आहे.

महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला तेजस्विनी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांसाठी 24 तेजस्विनी बस पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातील 19 मार्गांवर धावत आहेत. तेजस्विनी बस स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा विविध मार्गांवर चालते.
महिला दिन अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पीएमपीएमएल प्रशासनाने यात पुढाकार घेतला आहे.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

जिओकडून ग्राहकांना होळीचं मोठं गिफ्ट ! एक महिन्याचा मोफत रिचार्ज, असा घ्या या गिफ्टचा फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता हि गोष्ट मिळेल निम्म्या किमतीत, केंद्र सरकारची मोठी घोषणा

आता या राज्यातील महिलांना मिळणार १२ हजार रुपये, असा करा अर्ज

‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या 28 ‘तेजस्विनी’ बसेस आहेत, म्हणजे फक्त महिलांसाठी. महिला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने पीएमपी प्रशासनाने पुरुष प्रवाशांनाही या बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली. मात्र, दर महिन्याच्या ८ तारखेला फक्त महिला प्रवाशांनाच प्रवास करता येईल. तेही मोफत.

तेजस्विनी या मार्गावर चालते:
स्वारगेट – हडपसर
स्वारगेट – धायरी
स्वारगेट – एरंडवणे
मनपा भवन – लोहगाव
आप्पा बळवंत चौक – सांगवी
तेजस्विनी सध्या कोथरूड – विश्रांतवाडीसह एकूण 23 मार्गांवर चालते.