काय सांगता ! आता फक्त झोपायचे आणि लाखो रुपये कमवायचे, ‘या’ संस्थेमध्ये मिळते झोपायची नोकरी


Marathi / Tuesday, April 11th, 2023

Nasa Artificial Gravity Bed Rest Experiment :  जगभर लोक उपजीविकेसाठी विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतलेले आहेत. लोक दोन गटात विभागलेले आहेत, व्यापारी लोक आणि पगारदार लोक. या रोजगार गटांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमधील लोक काहीसे संतृप्त आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळते. या ग्रुपचे सदस्य सतत काम करत असतात. यामुळे ते अशी नोकरी शोधत राहतात जिथे कोणतेही टेन्शन नसते, कामावरून बॉसशी बोलण्याची गरज नसते. त्यांच्यापैकी काहींना काम कमी आणि पैशाची अपेक्षा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आरामदायी कामाबद्दल सांगणार आहोत.

हि संस्था देणार झोपायचे पैसे ?

NASA या अमेरिकन संस्थेमध्ये म्हणजेच ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एजन्सी’मध्ये भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना झोपण्याचा पगार मिळेल. नासाची ही कहाणी व्हायरल झाली आहे. त्यामुळे या कामाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे जर्मन एरोस्पेस सेंटर बर्‍याच काळापासून कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्टवर संशोधन करत आहेत. या प्रयोगात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना दरमहा 13 ते 14 लाख रुपये मानधन दिले जाते, असे सांगितले जाते.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

या तारखेला पडेल पीएम किसान चा १४ वा हप्ता, द्यावी लागतील हि कागदपत्रे 

चुक गुगल पे ची मालामाल झाले युजर ! अनेकांच्या खात्यावर जमा झाले ८० हजार, पहा तुम्हाला पडलेत का 

नासाच्या एका संशोधन प्रयोगात, बेडवर झोपून व्यक्तीच्या शरीराचा अभ्यास केला जातो. रात्रंदिवस एकाच जागी झोपल्याने मानवी शरीरात कोणते बदल घडू शकतात हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एजन्सी या अमेरिकन संस्थेच्या माध्यमातून या प्रयोगात यापूर्वीही अनेक जण सहभागी झाले आहेत. या प्रयोगात सहभागी झालेल्यांना दोन महिने शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागते.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अनुदान लाभार्थी यादी जाहीर 

5 वी ते 12 वी पास उमेदवारांना पुण्यात ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

सोशल मीडियावर व्हयरल झाले आहे हे काम

याबाबतची सविस्तर माहिती अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. या माहितीनुसार, नासाच्या कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्ट प्रयोगात सहभागी होणाऱ्या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी 18 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 14 लाख रुपये दिले जातात. म्हणजेच एका महिन्यात ७ लाख रुपये खर्च होतात. दरम्यान, ही कथा खरी की खोटी याबाबत लोक संभ्रमात आहेत. काहींनी ही कथा खोटी असल्याचेही म्हटले आहे.