आता आधार कार्ड अपडेट होणार मोफत ! मोदी सरकारची मोठी घोषणा


Marathi / Friday, March 17th, 2023

आधार कार्ड अपडेट: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अनेक निर्णयांचा सपाटा लावला आहे. देशभरातील नागरिकांना स्वस्त दरात सुविधा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. मोदी सरकारने आधार कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आधार कार्ड अपडेट

मग ते सरकारी काम असो वा खाजगी काम किंवा ओळखपत्र म्हणूनही आता आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळेच मुलाच्या जन्मानंतर लगेच आधार कार्ड जारी केले जात आहेत. मात्र, जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मिळाल्यापासून 10 वर्षे झाली असतील, तर ते अपडेट करणे आवश्यक आहे.

यापूर्वी आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये आकारले जात होते. मात्र, मोदी सरकारने आता आधार अपडेट मोफत केले आहेत. त्यामुळे, जे वापरकर्ते त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करतात ते आता ते मोफत अपडेट करू शकतील. केंद्र सरकारने बुधवारी ही घोषणा केली.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

या तारखेपासून सर्व महिलांना S.T. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये ५०% सवलत

१२ वी पासवर या जिल्ह्याची निघाली अंगणवाडी भरती; असा करा अर्ज

४ थी पासवर 47 हजार पगार; मुंबई हाय कोर्ट मध्ये काम करण्याची संधी

आधार ऑनलाइन अपडेट करणाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी यासाठी 50 रुपये आकारले जात होते. पण, आता आधार कार्ड अपडेट मोफत होणार आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑफलाइन किंवा केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता. आधार अपडेट ऑनलाइन गती वाढवण्यासाठी मोदी सरकारने 50 रुपये शुल्क तात्पुरते बंद केले आहे. आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये घेतले जात होते. पण आता 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत मोफत अपडेट करता येणार आहे. म्हणजेच 14 जून 2023 पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

आधार ऑनलाइन कसे अपडेट करायचे?

  • सर्वप्रथम myAadhaar पोर्टलवर जा, येथे तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करा वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागेल.
  • एक नवीन विंडो उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. याची पडताळणी करावी लागेल.
  • तुम्हाला तुमचा पत्ता पुरावा अपलोड करून सबमिट करावा लागेल.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे आधार अपडेट केले जाईल. तसेच 14 अंकी URN देखील जनरेट होईल.