आता शेजारच्या दुकानातूनही ऑनलाईन मागवता येणार सामान, फोन पे ने लॉन्च केले अँप


Marathi / Wednesday, April 5th, 2023

आता पानटपरी, फेरीवाल्यांचे गाडी, चहाची दुकाने, मोठी हॉटेल्सपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सर्वत्र UPI व्यवहार होत आहेत. कुठेही काही विकत घ्यायचे असल्यास ग्राहक दुकानदाराकडून स्कॅनर कोड मागतो. विविध UPI कंपन्यांनी खरेदीदारांना कोड करण्यासाठी छान कार्ड तयार करून दिली आहेत.

पेमेंटसाठी UPI अँपचा वापर वाढत आहे. भारतातील बहुतेक लोक पेमेंटसाठी पेटीएम, फोन पे, गुगल पे इत्यादी वापरतात. UPI द्वारे केलेल्या एकूण व्यवहारांपैकी सुमारे 50 टक्के व्यवहार PhonePe द्वारे केले जातात.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

Military Hostel Bharti २०२३ :जिल्हा सैनिकी वसतिगृहात १० वी वरती भरती सुरु, असा करा अर्ज

आता आधार कार्ड अपडेट होणार मोफत ! मोदी सरकारची मोठी घोषणा

घरामधील फ्रिज हाच आहे मोठा बॉम्ब ! आजच करा हे काम नाहीतर फुटेल बॉम्ब

दरम्यान, PhonePe ने पिनकोड नावाचे नवीन अँप लाँच केले आहे तो एक ONGC चा भाग आहे. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स हा सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे जिथे वस्तू आणि सेवांची डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर देवाणघेवाण केली जाऊ शकते. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवरून एकाच ठिकाणाहून वस्तू खरेदी किंवा विक्री करू शकता. परंतु या वेबसाइट देखील ONDC चा एक भाग आहे.

सध्या कंपनीने हे नवीन अँप बेंगळुरूमध्ये लॉन्च केले आहे. सुरुवातीला लोक या अँपद्वारे किराणा सामान, औषधे आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतील. म्हणजेच, आता तुम्ही जवळपासच्या दुकानांमधूनही ऑनलाइन वस्तू मागवू शकणार आहात. कंपनीने म्हटले आहे की ते हळूहळू इतर शहरांमध्ये देखील हे अँप आणतील आणि या वर्षाच्या अखेरीस दररोज 1 लाख ऑर्डर घेण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या PhonePe ई-कॉमर्स सेगमेंटमध्ये स्विचशी व्यवहार करते. हे ग्राहकांना हॉटेल, प्रवास बुकिंग इत्यादी अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवते. तुम्ही Google Play Store आणि Apple App Store वरून PhonePe चे नवीन अँप ‘Pincode’ डाउनलोड करू शकता.