आता केवळ १ रुपयात यासाठी करता येणार अर्ज ! शासनाची मोठी घोषणा


शासकीय योजना / Friday, March 10th, 2023

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी फडणवीस यांनी पीक विम्याबाबत (पिक इन्शुरन्स स्कीम) शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आता फक्त 1 रुपये मध्ये पीक विम्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजना 2016 मध्ये शेतकऱ्याला विम्याच्या प्रीमियमच्या 2 टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे. आता हा भाग शेतकऱ्यावर ठेवण्याऐवजी राज्य सरकार पीक विम्याचा हिस्सा देईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. फडणवीस यावेळी म्हणाले की, शेतकरी पंतप्रधान पीक विमा पोर्टलवर फक्त 1 रुपये भरून नोंदणी करू शकतो.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

फक्त २०००० रुपयात सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई

अरे बापरे ! मगरीने चक्क तोडली हि गोष्ट

हे फीचर एक्टिवेट करा आणि मिळावा १०० रुपये कैशबैक, जाणून घ्या प्रॉसेस

सोबतच 2017 मध्ये राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेंतर्गत 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,683 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.