सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती सुरु, पहा काय आहे प्रोसेस


नौकरी भरती / Friday, March 3rd, 2023

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. हे अर्ज दिनांक ०३ मार्च २०२३ म्हणजेच आजपासून चालू झाले असून त्याची अंतिम मुदत हि १७ मार्च असेल अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे यांनी दिली आहे.

Solapur Anganwadi Bharti 2023

आपल्याला हेही वाचायला आवडेल

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला अखेर यश; मानधनात झाली एवढी वाढ आणि पेन्शन योजनाही सुरू

अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया

अंगणवाडी साठी अर्ज भारताय ? हि कागदपत्रे तयार ठेवा

पंढरपूर तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे रिक्त असल्यामुळे बालकांच्या शिक्षणावर व कुपोषणावर परिणाम होत असल्यामुळे पालकांकडून वारंवार रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी होत होती.मात्र शासनाकडून कोणताही आदेश न मिळाल्यामुळे हि रिक्त पदे भरली जात नव्हती आता शासन आदेश आल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे यांची रिक्त पदे भरण्यासाठी पंढरपूर पंचायत समिती प्रशासन यांच्या हालचालींना वेग आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती सुरु, पहा काय आहे प्रोसेस