तुमच्या किंवा घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार, पॅन आणि मतदान कार्डचे काय करायचे, माहित आहे का ?


Marathi / Wednesday, March 1st, 2023

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. बँकेतील कोणत्याही कामाकरिता पॅन कार्ड आधार कार्ड आवश्यक आहे. ही कागदपत्रे नसल्यामुळे कामात अडथळा येतो.
पण लक्षात घ्या की व्यक्ती जिवंत असेपर्यंत या कागदपत्रांची गरज असते, पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचे काय होते? या मृत व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

1. पॅन कार्डशी संबांधित घ्यावयाची काळजी
पॅन कार्ड हे व्यवसाय ओळखपत्र म्हणून वापरले जाते. कोणतेही आर्थिक काम पूर्ण करण्यासाठी हे पॅनकार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर काय होते असा प्रश्न अनेकांना पडतो.
त्या व्यक्तीच्या पॅनकार्डचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते. तुमच्या घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास, तुम्ही ताबडतोब आयकर विभागाशी संपर्क साधून त्याचे पॅनकार्ड सरेंडर करावे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

शेकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्युज ! सरकार या योजनेसाठी देत आहे ९०% अनुदान, आजच लाभ घ्या

दहावीची परीक्षा देताय ? हे नियम माहित आहेत का नाहीतर बाहेर बसावे लागेल

या विद्यार्थ्यांना मिळणार शाळेत मोफत प्रवेश ! फॉर्म झाले सुरू

2. आधार कार्ड संबांधित घ्यावयाची काळजी
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड सरेंडर करण्याचा पर्याय नाही. तुम्ही मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करून घेऊ शकत, म्हणजे त्याचा गैरवापर होणार नाही. (आधार कार्ड लॉक केल्यानंतर ते कोठेही वापरता येत नाही )

3. मतदार ओळखपत्र संबांधित घ्यावयाची काळजी
मतदानासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. त्यामुळे आमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. कारण तसे नसेल तर निवडणुकीत मतदान करता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तुम्ही फॉर्म 7 भरून त्या व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता.