शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! या तारखेपूर्वी होणार नुकसान भरपाईचे वाटप


Marathi / Wednesday, March 1st, 2023

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 755 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी अतिवृष्टीची भरपाई मिळेल.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

या रेशनकार्डधारकांना रेशन धान्याऐवजी खात्यात मिळणार पैसे, हा फॉर्म भरला तरच मिळणार…

पी एम किसान पैसे आले नाहीत; करावे लागेल हे काम तरच पैसे पडतील

बँक स्टेटमेंट वर्षातून कितीवेळा काढले पाहिजे; माहित आहे का ?

याबाबत सदस्य प्रकाश सोळंकी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3,300 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी आहे. त्याची वैधता तांत्रिक समितीद्वारे तपासली जाईल. विविध नैसर्गिक आपत्तींसाठी शेतकऱ्यांना दिलेल्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, आतापर्यंत 4 हजार 700 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.