अंगणवाडी सेविकांना आनंदाची बातमी ! सेविका २०% आणि मदतनीस १०% वाढ होणार


नौकरी भरती / Saturday, March 4th, 2023

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या पगारात 20 टक्के आणि मदतनिसांच्या वेतनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती सुरु, पहा काय आहे प्रोसेस

अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया

अंगणवाडी साठी अर्ज भारताय ? हि कागदपत्रे तयार ठेवा

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन मोबाईलही खरेदी केले जात आहेत. या मोबाईल अॅपमध्ये ‘ट्रॅक अॅप’ असून, माहिती अपडेट करताना नाव इंग्रजीत भरले तरी उर्वरित माहिती मराठीत भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मंत्री म्हणाले. लोढा म्हणाले.

माहिती देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, सेविकांना 20 टक्के तर मदतनिसांना १० टक्के पगारवाढ करण्यात येत आहे. यासोबतच मे महिन्यापर्यंत आम्ही २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार आहोत. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल फोन खरेदीसाठी 150 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.