काय तुमचे आधार कार्ड १० वर्षांचे झाले आहे ? मग तुम्हाला हे काम काम करावेच लागेल


शासकीय योजना / Saturday, March 4th, 2023

आधार कार्ड अपडेट : काढल्यानंतर काळानुरूप अनेक बदल होत असतात . पत्ता, फिंगर प्रिंट, नावातील चुका, मोबाईल नंबर याप्रमाणेच अनेकदा एकापेक्षा जास्त गोष्टींमध्ये आधार कार्डात बदल होण्याची शक्यता असते. आधार कार्डमध्ये संबंधितांची माहिती नोंदवली जात असल्याने या सर्व नोंदी अद्ययावत करणे आवश्यक आहे. यासाठी दर दहा वर्षांनी आधार अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे 10 वर्षांहून अधिक काळ आधार कार्ड जारी केलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन आधार अपडेट करून घ्यावे.

आधार कार्ड अपडेट

यासाठी राज्य सरकारने डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, ई-मेल) 50 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी (फिंगरप्रिंट, डोळयातील पडदा स्कॅन) 100 रुपये शुल्क निश्चित केले आहे. परंतु, नागरिकांनी 15 मार्च ते 14 जून 2023 आणि myAadhaar पोर्टलद्वारे (myaadhaar.uidai.gov.in) स्वतःहून आधार कार्ड माहिती अपडेट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही त्यानंतर 25 रुपये शुल्क आकारले जाईल.

आपल्यला हेही वाचायला आवडेल

पॅन-आधार लिंक; फक्त या लोकांना शासनाकडून सूट

आता घरबसल्या आपले आधार कार्ड लॉक करा, होणारे नुकसान टाळा

शेवटची तारीख ! या तारखेनंतर तुमचे हे कार्ड होणार बंद

आधारची 10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी तात्काळ आधार अपडेट करून सहकार्य करावे. नागरिकांनी आपले आधार रद्द होणार नाही याची काळजी घ्यावी व भविष्यात होणारी गैरसोय टाळता येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.