CRPF Mega Bharti २०२३; १० वी वरती देशातील तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची सर्वात मोठी भरती


नौकरी भरती / Friday, April 7th, 2023

CRPF Mega Bharti 2023: देशातील बेरोजगारांसाठी महत्त्वाची बातमी. गृह मंत्रालयाने सीआरपीएफमध्ये सुमारे 1 लाख 30 हजार कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले असून ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.

CRPF Mega Bharti 2023

देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने अनेक विभागांना सरकारी रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गृह मंत्रालयाने सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबलची सुमारे 1 लाख 30 हजार पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. ही मेगा भरती तरुणांसाठी उत्तम संधी आहे. आपण या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

CRPF मध्ये 1 लाख 30 हजार कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल स्तर 3 पदे भरण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित करेल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.किंवा माजी सैनिकांच्या बाबतीत समकक्ष लष्करी पात्रता असावी. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

काय सांगताय राव ! आता फोन पे, गूगल पे वर खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार

अबब ! ३० हजार रुपये किलो भाजी; सुरु करा या भाजीचा व्यवसाय, बाजारात प्रचंड मागणी

काय सांगता ! फक्त २ रुपयांमध्ये खरेदी करा ब्रँडेड शर्ट आणि टी-शर्ट, फ्लिपकार्टची सुपर ऑफर

उमेदवारांची निवड शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि लेखी चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा आहे. या पदाची वेतनश्रेणी 21 हजार 700 ते 69 हजार 100 इतकी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटीसमध्ये जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.