आनंदची बातमी ! राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला मान्यता, एवढी मिळणार वाढ


Marathi / Friday, April 7th, 2023

राज्यातील कोतवालांच्या पगारवाढीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. कोतवालांचे मानधन आता 7500 रुपयांवरून 15000 रुपये करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी केलेल्या घोषणेनुसार 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कोतवालांच्या पगारवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

मोठी बातमी ! पोलीस शिपाई भरतीसाठी एका जिल्ह्यातून एकच अर्ज मान्य होणार काय ?

Mahanagarpalika Bharti २०२३ : या महानगरपालिकेत या पदासाठी होणार विना परीक्षा थेट मुलाखत, असा करा अर्ज

१० वी वरती देशातील तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची सर्वात मोठी भरती

त्यानुसार कोतवालचे मानधन सध्याच्या 7,500 रुपयांवरून 15,000 रुपये सेवेच्या कालावधीनुसार वाढवले ​​जाईल. राज्यातील सर्व 12 हजार 793 कोतवालांना आता दरमहा 15 हजार रुपये मानधन देण्यात आले आहे. 15 हजार रुपये 01 एप्रिल 2023 पासून दिली जाईल.