पोलीस भरतीसाठी कायपण ! जास्त गुण मिळवणासाठी केला हा प्रकार, 16 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल


नौकरी भरती / Friday, April 7th, 2023

सध्या पोलीस भरती चालू असून मुलांची मानसिकता कसेही करून भरती व्हायचंच वाढत आहे त्यातूनच ते गैरप्रकाराकडे वळतात. मुंबई पोलीस भरतीतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शर्यतीत अधिक गुण मिळवण्याच्या उद्देशाने चिपची अदलाबदल केल्याचे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 उमेदवारांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू झाली होती.

गैरप्रकार कसा समोर आला

भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करून प्रथमच मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात आली होती. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक होण्यासाठी या तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. मात्र, मैदानी चाचण्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची प्रकरणे आली आहेत. शर्यतीच्या अचूक वेळेसाठी चिप वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मात्र काही उमेदवारांनी अधिक गुण मिळविण्यासाठी चिपची अदलाबदल केल्याचे समजल्यावर चिपची पडताळणी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये रेकॉर्ड केलेल्या वेळेत गैरप्रकार समोर आला व त्यानंतर पोलिसांनी उमेदवारांवर गुन्हा दाखल केला आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आनंदची बातमी ! राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला मान्यता, एवढी मिळणार वाढ

मोठी बातमी ! पोलीस शिपाई भरतीसाठी एका जिल्ह्यातून एकच अर्ज मान्य होणार काय ?

या महानगरपालिकेत या पदासाठी होणार विना परीक्षा थेट मुलाखत, असा करा अर्ज

मुंबईतील आठ हजार जागांसाठी सात लाख उमेदवार भरतीसाठी रिंगणात

दरम्यान, मुंबई पोलीस दलात 8070 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आठ हजार जागांसाठी सुमारे सात लाख उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील मरोळ, नायगाव आणि कलिना मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे.
पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांकडून फसवणूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. काही वर्षांपूर्वी एका उमेदवाराने पोलीस भरती परीक्षेत उंचीसाठी पात्र न ठरल्याने त्याचे केस कृत्रिमरीत्या वाढवले ​​होते. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच तापले होते. आता शर्यतीत चिप बदलण्याचा प्रकार समोर आला आहे. उमेदवार भरती होण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत.