WhatsApp Gas Booking : आता घरबसल्या WhatsApp वरून गॅस बुकिंग करा मिनिटांत, असे करा बुकिंग


Marathi / Sunday, April 9th, 2023

WhatsApp Gas Booking : तुम्ही जर गॅस सिलिंडर वापरात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून LPG गॅस सिलेंडर बुक करू शकता. होय हे खरे आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस रिफिलिंगसाठी ग्राहकांना व्हॉट्सअॅप आणि एसएमएसची सुविधा दिली आहे. याअंतर्गत भारत गॅस, इंडेन आणि एचपी गॅस यांसारख्या कंपन्यांचे ग्राहक अगदी कमी वेळात गॅस सिलिंडर ऑर्डर करून आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घरी बसून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
खालील पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या गॅस कंपनीचे गॅस बुकिंग तुम्ही करू शकता.

WhatsApp Gas Booking

व्हॉट्सअॅप गॅस बुकिंग एचपी गॅस सिलिंडर साठी

यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये HP ग्राहक सेवा क्रमांक 9222201122 सेव्ह करा. हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जाऊन सेव्ह केलेला नंबर ओपन करा. आता HP गॅस सिलेंडर क्रमांकावर मेसेज बुक पाठवा. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून बुक असा मेसेज पाठवताच तुम्हाला ऑर्डरचे तपशील मिळतील. सिलिंडर कधी वितरित केला जाईल यासह तुम्हाला यावेळी संपूर्ण माहिती मिळेल.

व्हॉट्सअॅप गॅस बुकिंग इंडेन गॅस सिलिंडर साठी

इंडेन गॅस ग्राहक 7588888824 या क्रमांकावर बुक करू शकतात. सर्वप्रथम हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्यानंतर WhatsApp उघडा. तेथून हा सेव्ह केलेला नंबर उघडा आणि नोंदणीकृत नंबरवरून Book किंवा REFILL लिहून संदेश पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑर्डरबाबत सूचना प्राप्त होईल. या तपशीलांमध्ये तुम्हाला तुमच्या सिलेंडर बुकिंगची डिलिव्हरी तारीख देखील दिसेल. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या ऑर्डरची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला या क्रमांकावर STATUS आणि ऑर्डर क्रमांक लिहावा लागेल.

👇👇👇

आपल्याला हेही वाचायला आवडेल

आधार-पॅन लिंकिंग बाबत केंद्र सरकारने घेतली कडक भूमिका, ऐकून बसेल तुम्हाला धक्का…

 कांदा अनुदान अर्ज सुरु, पहा अर्ज कसा करायचा

कृषी विभाग भरती सुरु, पहा कसा करायचा अर्ज

व्हॉट्सअॅप गॅस बुकिंग भारत गॅस सिलिंडर साठी

भारत गॅस सिलिंडर असलेले ग्राहक 1800224344 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सिलिंडर बुक करू शकतात. HP आणि Inden Gas प्रमाणे येथेही तुम्हाला WhatsApp वर जाऊन हा क्रमांक उघडावा लागेल. आणि Book हा संदेश पाठवायचा आहे . त्यानंतर तुम्हाला ऑर्डरचा तपशील मिळेल आणि सिलिंडर कधी मिळेल. याशिवाय तुम्ही https://my.ebharatgas.com/bharatgas/Home/Index वेबसाइटला भेट देऊन घरी बसून गॅस सिलिंडर बुक करू शकता.