ZP Bharti 2023 : या जिल्हा परिषद मध्ये संगणक ऑपरेटर पदाची भरती, असा करा अर्ज


नौकरी भरती / Monday, April 10th, 2023

ZP Bharti 2023 : सध्या अनेक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांच्या जागा निघत आहेत. जिल्हा परिषद वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयानेही पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात.

ZP Bharti 2023

संगणक ऑपरेटर , तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक/महसूल सहाय्यक इत्यादी पदांसाठी भरती केली जात आहे. अर्ज 13 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशा प्रकारे पाठवायचे आहेत.

भरावयाची पदे व संख्या

  • संगणक ऑपरेटर – दोन जागा
  • सेवानिवृत्त तहसीलदार/नायब तहसीलदार – एक जागा
  • सेवानिवृत्त अव्वल कारकून/महसूल सहाय्यक – दोन जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • संगणक ऑपरेटर पदासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा आणि MSCIT उत्तीर्ण असावा, उमेदवाराने मराठीत 30 आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन चाचणी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असावे, अर्जदाराची परीक्षा होईल.

वयाची अट

संगणक ऑपरेटर पदांसाठी उमेदवाराची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असेल.

निवड करण्याची पद्धत

वरील पदांसाठी भरती मुलाखतीद्वारे केली जाईल आणि संगणक ऑपरेटर पदासाठी टायपिंग चाचणी घेतली जाईल आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

👇👇👇

आपल्याला हेही वाचायला आवडेल

राज्यातील या मुलांना मिळणार शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्का आरक्षण, शासनाचा मोठा निर्णय

आता घरबसल्या WhatsApp वरून गॅस बुकिंग करा मिनिटांत, असे करा बुकिंग

आधार-पॅन लिंकिंग बाबत केंद्र सरकारने घेतली कडक भूमिका, ऐकून बसेल तुम्हाला धक्का…

अर्ज पद्धत

उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावे लागतील, ईमेलद्वारे किंवा ऑनलाइनद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कधीपर्यंत करावेत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात 6 एप्रिल 2023 ते 13 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10:30 ते सायंकाळी 05:00 दरम्यान सादर करणे आवश्यक आहे.

वेतन

  • संगणक ऑपरेटर – 23000
  • निवृत्त तहसीलदार / नायब तहसीलदार – 35000
  • सेवानिवृत्त मुख्य लिपिक/महसूल सहाय्यक – 25000

अर्ज असा करावा

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑफलाइन मोडद्वारे सबमिट करावेत, ऑनलाइन मोड किंवा ईमेल केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेची छायाप्रत जोडावी, मूळ प्रत अर्जासोबत जोडू नये.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवाराचे काम समाधानकारक न आढळल्यास त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन बडतर्फ करण्यात येईल.
  • आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी ओव्हरटाइम काम करणे बंधनकारक असेल.