या तारखेला लागेल तलाठी भरतीचा निकाल । Talathi Bharti Update 2023


नौकरी भरती / Tuesday, November 7th, 2023
70 / 100

Talathi Bharti Update 2023 : तलाठी भरती 2023 ही एक महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण भरती आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात तलाठी पदासाठी 4,600 हून अधिक रिक्त जागा उपलब्ध होत्या.तलाठी भरती 2023 ची परीक्षा प्रक्रिया प्रगतीपथावर आली आहे आणि उमेदवारांनी आधीच परीक्षा पूर्ण केली आहे. अनेक इच्छुक आता परीक्षा निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

Talathi Bharti Update 2023

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. एकत्रित आक्षेप घेतल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा फायनल केल्या जातील. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना गुण कळतील; तसेच गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल.

You May Also Read

जलसंपदा विभाग भरती 2023 | WRD Maharashtra Recruitment 2023

राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठी भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, त्यानुसार नुकत्याच तलाठी पदासाठी परीक्षा सर्व राज्यभर घेण्यात आल्या आहेत. आता परीक्षार्थीना प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा यादी परीक्षेतील गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची. राज्यातील 4 हजार 466 तलाठी पदांसाठी सुमारे 8 लाख 56 हजार उमेदवार महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षेला बसले होते. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली होती . त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांच्या नमुना उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या तारखेला लागेल तलाठी भरतीचा निकाल

तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी एक महिन्याचा अवधी दिला जाईल. त्यानंतर प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली जातील, असे आनंद रायते यांनी सांगितले.
उमेदवारांनी घेतलेला आक्षेप योग्य असल्यास, त्यानुसार उत्तरपत्रिका बदलण्यात येईल. हरकती फी १०० रु. असून ती संबंधित उमेदवाराला परत केले जातील. उमेदवारांना 26 जानेवारी 2024 रोजी राज्यपालांकडून नियुक्ती पत्र दिले जाईल. अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते म्हणाले की, उमेदवारांच्या नियुक्तीचे ठिकाण फेब्रुवारीमध्ये ठरवले जाईल.