स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या या परीक्षेचे आले प्रवेशपत्र, असे करा डाउनलोड


Marathi / Thursday, February 23rd, 2023

ज्या उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या वतीने कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचा फॉर्म भरला होता, त्यांचे पेपर २ चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.

पेपर 1 परीक्षेत निवडलेले उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSC JE पेपर 2 ची परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

एसएससी जेई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाली. या रिक्त पदासाठी पहिला पेपर १४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. पहिल्या पेपरचा निकाल 18 जानेवारी 2023 रोजी जाहीर झाला होता. आता दुसऱ्या पेपरचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील Latest Update क्लिक करा.
आता SSC JE Paper 2 Admit Card 2023 च्या लिंकवर जा.
येथे तुमच्या झोनच्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका.
सबमिशन केल्यावर, प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल.
प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Direct Admit Card Download Link