काय सांगता ! आता डेबिट कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे कसे ते पहा


Marathi / Monday, February 27th, 2023

डेबिट कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सोयीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, आता नवीन तंत्रज्ञानामुळे तुम्ही कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असल्यास किंवा तुमचे एटीएम कार्ड घरी विसरल्यास, तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता.
जर तुम्ही BHIM, Paytm, PhonePe, Google Pay, Amazon Pay सारखे UPI अॅप्स वापरत असाल तर तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून सहज पैसे काढू शकता. दरम्यान, UPI द्वारे कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सध्या फक्त निवडक बँक एटीएममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँकेच्या एटीएमचा समावेश आहे.

UPI अॅपद्वारे एटीएममधून पैसे कसे काढले जातात ?

  • एटीएम स्क्रीनमध्ये पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
  • आता स्क्रीनमध्ये UPI चा पर्याय निवडा.
  • यानंतर एक QR कोड येईल.
  • तुमच्या मोबाईलमध्ये UPI अॅप उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
  • आता रक्कम टाका. (या सुविधेद्वारे तुम्ही एकावेळी जास्तीत जास्त 5000 रुपये काढू शकता.)
  • UPI पिन एंटर करा आणि नंतर Proceed वर टॅप करा.
  • आता तुम्हाला एटीएम मशिनमधून पैसे मिळाले.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

मोठी बातमी ! आता या बँकांतील पैसे ग्राहक काढू शकणार नाही, रिझर्व्ह बँकेची कारवाई

एसबीआय बँकेच्या या योजनेत मिळेल सर्वाधिक व्याज, योजना ठराविक कालावधीपुरती

आता या गोष्टींशिवाय तुम्ही बँकेत पैसे जमा करू शकणार नाही

UPI म्हणजे काय?
दरम्यान, UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे UPI च्या माध्यमातून तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. UPI सह, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. तसेच एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी सारखीच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो.