MPSC कडून या पदांची मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?


Marathi / Monday, February 27th, 2023

शिंदे सरकार (महाराष्ट्र शासन) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) मेगा भरती जाहीर केली आहे. यासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा 2023 अंतर्गत राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये विविध संवर्गाच्या एकूण 673 पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर ही जाहिरात तुम्ही पाहू शकता. याशिवाय ट्विटही केले आहे.

राज्य सरकारच्या पाच विभागांमध्ये ही भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात सामान्य प्रशासन विभागाचाही समावेश आहे. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी उमेदवार 22 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

कोणत्या विभागात किती पदे भरली जाणार आहेत ?
सामान्य प्रशासन विभागात 295, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागात 130, सार्वजनिक बांधकाम विभागात 15, अन्न व नागरी विभागात 39, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागात 194 पदे भरण्यात येणार आहेत. या सर्वांना गट-अ आणि गट-ब संवर्गाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.

MPSC कडून या पदांची मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?
                                 MPSC कडून या पदांची मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

पूर्व परीक्षा किती तारखेपर्यंत होणार आहे ?
या भरतीसाठीची प्राथमिक परीक्षा राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जून रोजी होणार असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाने दिली आहे.

आपल्याला हेही वाचायला आवडेल

मोठी संधी ! या पदांसाठी MPSC ची जाहिरात प्रसिद्ध, लवकर करा अर्ज

5 वी ते 10 वी वरती या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी, पहा कसा अर्ज करायचा

अंगणवाडीत मिळणार २० हजार महिलांना नोकरी, ३१ मे पर्यंत चालणार भरती प्रक्रिया

मुख्य परीक्षेचे वेळापत्रक कश्या प्रकारचे आहे?
एकत्रित प्राथमिक परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वेगळी मुख्य परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

MPSC कडून या पदांची मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?
                    MPSC कडून या पदांची मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब आणि विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब साठी मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. निरीक्षक वैधता गट ब मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाईल. अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.